रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा

रत्नागिरी : शनिवारी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आढावा घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

सिंह यांनी यावेळी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये एसएसटी, एफएसटी पथकांकडून केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. एसएसटी, एफएसटी पथकांनी कशा प्रकारे काम करावे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. सिंह यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन उपलब्धता, प्रशिक्षण, मतदान साहित्य, नामनिर्देशन, टपाली मतदान प्रक्रिया आदी विषयांचाही आढावा घेतला. बैठकीनंतर सिंह यांनी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या ईव्हीएम मशिन्स सुरक्षा कक्षाला भेट देऊन पाहणी केली व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड आणि विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी देसाई उपस्थित होते. हातखंबा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील हातखंबा येथील स्थिर सर्वेक्षण पथकाच्या तपासणी नाक्याला जिल्हाधिकारी सिंह आणि पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी देसाई उपस्थित होते. एसएसटीने केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. सतर्क राहून वाहनांची तपासणी करण्याबाबत सूचना दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 28/Oct/2024