रत्नागिरी : जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या वतीने ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणारे निवृत्त वेतन व इतर लाभ देण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक, प्रतिनिधी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 27/Dec/2025














