मंडणगड : तालुक्यातील स्थानिक व्यापाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या त्रासाविरोधात शिंदेसेनेच्या व्यापारी विधानसभा अध्यक्ष दीपक घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना लेखी निवेदन देऊन या व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मंडणगड तालुक्यात गेल्या चार वर्षापासून कोणतीही परवानगी, नोंदणी, कर भरणा अथवा कायदेशीर मान्यता नसताना फेरी व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे स्थानिक नोंदणीकृत व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाचा महसूलही बुडत असल्याचे म्हटले आहे.
या निवेदनात पथ विक्रेते कायदा २०१४, भारतीय न्याय संहिता २०२३, बीएनएसएस २०२३ तसेच महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत अधिनियमातील विविध कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 27/Dec/2025














