आजचे राशीभविष्य, २९ डिसेंबर २०२५

मेष – आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल.

वृषभ – आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे.

मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल.

मिथुन – आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

कर्क – आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल.

सिंह – आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

कन्या – आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान – सन्मान होतील.

तूळ – कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा.

वृश्चिक – आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल.

धनु – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

मकर – आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील.

कुंभ – आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल.

मीन – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 29-12-2025