चिपळूण : शहरानजीक कळंबस्ते गावच्या हद्दीत कळंबस्ते धामणंद रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ एका वाहनात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य असल्याची खबर मिळाल्याने उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करत तब्बल २ लाख ५८ हजार ९६० रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रवीण गणपत तांबिटकर (रा. वालोपे तांबिटकरवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये गोलन एस् व्हिस्की (गोवा राज्यनिर्मित) या नावाचे ७५० मिलीचे २२ बॉक्स २६४ बाटल्या (रु.१,६८९६०), ९० हजारांची एक मारुती ८०० गाडी (एमएच-०४-एएक्स-७०५०) असा एकूण २ लाख ५८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस. मालुसरे, तसेच व्ही. एस. विचारे, मयूर पुरीबुवा यांनी केली.
या आधी ऑगस्ट महिन्यातही याच अशा प्रकारे धाड टाकून राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी संशयितांकडून साडेपाच लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त करून कारवाई केली होती. चार महिन्यांनी पुन्हा त्यांच्याकडूनच दारू जप्त करून कारवाई करण्यात आली.
कारवाईचा निव्वळ फार्स ?
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जुगार मटक्यावर धाड टाकून याच प्रवीण तांबिटकरवर गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडून साहित्यासह रोख रक्कम जप्त केली होती. त्यामुळे एकाच संशयितांवर वारंवार कारवाई होऊनही त्याच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याने कारवाईचा निव्वळ फार्स करण्यात येतो की काय, असा संशय व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 29/Dec/2025














