Bhoste Ghat Accident | महामार्गावरील भोस्ते घाटात कारला अपघात; एक जखमी

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात धुक्यामुळे तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात मोटारीतून प्रवास करणाऱ्या सातपैकी एकजण जखमी झाला. मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जात असलेली एर्टिगा कार (क्र. एमएच-४७-बीके- ७४८४) भोस्ते घाटातील तीव्र वळणावर धुक्यामुळे नियंत्रण सुटून थेट सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली.

या अपघातात कारमधील एक प्रवासी जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली उभी असलेली श्री जगद्गुरु नरेंद्रचार्यजी संस्थान नाणिजधाम यांची अपघातग्रस्तांच्या मदतीस २४ तास तत्पर असलेली रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना त्वरित उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 29/Dec/2025