रत्नागिरी : मागील भांडणाचा राग मनात धरून मामा आणि भाचा या दोघांना शिवीगाळ करत दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी रात्री ८.४५ वा. सुमारास भरणे पाटणे कॉम्प्लेक्स येथे घडली.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अनिकेत साळुंखे आणि अजिंक्य साळुंखे (दोन्ही रा. भरणे ग्रामपंचायत पाठीमागे, खेड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात सनी नारायण भोसले (२६, रा. भरणे ग्रामपंचायत पाठीमागे, खेड) याने पोलिसांत तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शुक्रवारी रात्री अनिकेत साळुंखे हा दुचाकी (एमएच-०८- एशस-७७९२) वर मागे त्याचा भाऊ ऋषभ बाबुराव भोसले याला बसवून भरणेकडे येत होता. तो पाटणे कॉम्प्लेक्स येथे आला असता त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन्ही संशयितांनी मागील भांडणाचा राग मनात धरुन त्यातील अनिकेत साळुंखेने सनी भोसले याच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. दरम्यान, फिर्यादी अनिकेतचे मामा संतोष तात्य वाडकर हे तेथे वाद सोडवण्यासाठी आले असता संशयित अजिंक्य साळुंखेने त्यांनाही दगडाने मारहाण केली. त्यानंतर दोन्ही संशयितांनी फिर्यादी आणि त्याचे मामा संतोष वाडकर या दोघांनाही शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) (३), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 29/Dec/2025














