राजापुरात पाणी टंचाईग्रस्त गावे-वाड्यांच्या कृती आराखड्यासाठी आज सभा

राजापूर : राजापूर तालुक्याला भेडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर २९ डिसेंबर रोजी राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात दुपारी १२ वाजता आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांचा पाणी टंचाईग्रस्त कृती आराखडा तयार करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील काही वर्षे शासनाने पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्यामुळे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांचे प्रमाण कमी होताना दिसत असले तरीदेखील काही गावे आणि वाड्या यांची पाणी टंचाई मात्र अद्याप दूर झालेली नाही. त्यांना दरवर्षी टँकरची आवश्यकता भासत असते. यासाठी संबंधित सर्व विभागांना सभेला उपस्थित रहाण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 29/Dec/2025