रत्नागिरी : महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे उमेदवार सुरेंद्रनाथ तथा बाळ माने हे सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मविआकडून शक्तिप्रदर्शन होणार असून आठवडा बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मिरवणुकीने उमेदवार अर्ज भरणार आहेत. शहरातील आठवडाबाजार येथील आ. राजन साळवी यांच्या कार्यालयामधून ही रॅली निघणार आहे.
यावेळी कार्यालयाबाहेर मविआचे नेतेमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आ. भास्कर जाधव, आ. राजन साळवी, माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९.३० वाजता मेळावा होणार असून त्यानंतर ११.३० वा. अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी ‘उबाठा’च्या वतीने शक्तिप्रदर्शनही होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 28/Oct/2024














