चिपळूण : इलेक्ट्रिक शॉक लागून जखमी झालेल्या माकडावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला झाला. या कुत्र्याच्या तावडीतून माकडाची सुटका करून खेर्डी माळेवाडीतील वाघुळदे व तेथील नागरिकांनी माकडास प्राणीप्रेर्मीच्या ताब्यात दिले. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
खेर्डी माळेवाडी परिसरात नदीकिनारी माकडांचा व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नेहमीच होतो. या ठिकाणी एका माकडाला विजेचा शॉक लागल्याने तो खाली पडला असता भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घालून जखमी केले. दरम्यान, तेथे असलेल्या वाघुळदे कुटुंबीय व सहकाऱ्यांनी या माकडाला कुत्र्यांच्या तावडीतून सहीसलामत सोडवले व त्याला प्राणीप्रेमींच्या ताब्यात दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 29/Dec/2025














