Bhaskar Jadhav | शिवसेना-मनसे युती मराठी माणसांची एकजूट करणारी : आ. भास्कर जाधव

चिपळूण : मराठी माणसाच्या हिताकरिता शिवसेना – मनसे युती झाली आहे. ही युती मराठी माणसांची एकजूट करणारी असल्याने ही युती महाराष्ट्राची इच्छापूर्ती करणारी आहे, असे प्रतिपादन शिवसेना उबाठाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीची घोषणा केल्याबद्दल शनिवारी आ. जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिक व मनसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी आ. जाधव यांनी मार्गदर्शन करताना, मराठी माणसाच्या हितासाठी असलेली ही युती भविष्यात सर्वच निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. ही युती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी वाहतूक सेनेचे अध्यक्ष संभाजी खेडेकर, शिव उद्योग सेनेचे प्रभाकर जाधव, महिला आघाडी प्रमुख मानसी भोसले, युवा सेनेचे उमेश खाताते, विभागप्रमुख नितीन निकम, उपविभाग प्रमुख फैय्याज शिरळकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 29/Dec/2025