चिपळूण : विद्यार्थी घडवण्यामध्ये कुटुंब, शाळा आणि समाज यांचा मोलाचा वाटा असतो. त्यातही मुलांवर योग्य ते संस्कार करण्यात पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण योग्य निभावल्यास योग्य विद्यार्थी तथा पाल्य निर्माण होतो, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी येथे केले.
तालुक्यातील पेढे परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे होते.
देसाई पुढे म्हणाल्या, शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व ततसंबंधी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच सहकार्य करेन. विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभल्यास त्यांचा पुढचा मार्ग सुकर होईल. त्या दृष्टीने संस्थेने प्रयत्न करावेत.
यावेळी मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक विशाखा माळी, यांच्यासह संस्थेचे सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष गोपीनाथ रेपाळ, माध्यमिक शालेय समितीचे चेअरमन दिलीप माळी, संस्थेचे सल्लागार मधुकर मोरे, जनार्दन मालवणकर, अंतर्गत हिशेब तपासणीस नामदेव मोरे, तज्ञ संचालक मोहन शिंदे, परशुराम सरपंच गायत्री जोगले, धामणदेवी सरपंच संजीवनी नरळकर, एसटीचे विभागीय नियंत्रक बोरसे, कुलकर्णी, चिपळूण आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, क्रीडाकुल तालुका समन्वयक तुषार कदम, मुख्याध्यापिका नूतन शिंदे, मुख्याध्यापिका प्रज्ञा मेस्त्री उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 29/Dec/2025














