गुहागरमध्ये महायुतीकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी; आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

गुहागर : गेले पंधरा दिवस गुहागरच्या जागेचा महायुतीकडून तिढा सुटत नव्हता. भाजपने पहिल्या दिवसापासून या जागेवरती दावा सांगितला होता तर काही दिवसानंतर शिवसेनेकडून या जागेवर दावा सांगण्यात आला. शिवसेनेकडून अनेक इच्छुक यादीमध्ये घेण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

त्या नंतर राजेश बेंडल यांना गुहागरची उमेदवारी मिळणार, अशी जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर भाजपने सुद्धा या जागेवरचा दावा सोडला नव्हता. अखेर राजेश बेंडल यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली असून पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 28/Oct/2024