Pawas : कुर्धे प्राचीन खांबतळे संवर्धन व सुशोभीकरण काम प्रगतिपथावर

पावस : तालुक्यातील कुर्धे येथील कातळावरती प्राचीन खांबतळे असून त्याच्या संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर असून येत्या काही महिन्यांमध्ये काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना एक विरंगुळ्याचे व पाणी साठ्याच्या दृष्टीने या तळ्याचा उपयोग होणार आहे.

कुर्धे येथील कातळावरती खांब तळे म्हणून परिसर असून त्याच्या आजूबाजूला झाडेझुडुपे नाहीत. हे तळे पांडवकालीन असल्याचे बोलले जात असून या तळ्यामध्ये मेअखेरसुद्धा मुबलक पाणीसाठा असतो. या प्राचीन तळ्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्याच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थ अजय भिडे म्हणाले की, या तळ्याच्या संवर्धन व सुशोभिकरणाच्या माध्यमातून पाण्याच्या स्त्रोताच्या बळकटीकरणाला वाव मिळण्याची शक्यता आहे. हे पारंपरिक तळे असल्याने त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या तळ्याचा उपयोग परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 29/Dec/2025