रत्नागिरी : शहरातील जोशीला वाईन मार्टच्या बाजूच्या रस्त्यावर एका झाडाच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ ते २.४५ वा. करण्यात आली. दत्तात्रय नागनाथ कासार (५८, रा. तांबट आळी, रत्नागिरी) आणि प्रविण अनिल कळंबटे (४८, रा. मजगाव रोड, शिवाजी नगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात महिला पोलिस हेड काँस्टेबल सोनल शिवलकर आणि महिला पोलिस कॉस्टेबल आदिती जागकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी संशयित हे जोशीला वाईन मार्टच्या बाजुच्या रस्त्यावर एका झाडाच्या आडोशाला आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना त्याठिकाणी दारु पीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 29/Dec/2025














