रत्नागिरी : तालुक्यातील वाटद- खंडाळा येथे बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी दुपारी २.२७ वा. सुमारास करण्यात आली. दीपक अनंत धामणे (५१, रा. धामणेवाडी खालगाव जाकादेवी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हवालदार योगेश शेट्ये यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शुक्रवारी दुपारी तेथील पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे आडोशाला कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून असतानाही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 29/Dec/2025














