‘उबाठा’ शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी बिलाल म्हाळूणकर यांची नियुक्ती

मंडणगड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंडणगड शहरातील गोवळे सभागृहातील कार्यकर्ता सभेत तालुक्यातील म्हाप्रळ येथील बिलाल म्हाळूणकर यांची पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम यांनी बिलाल म्हाळूणकर यांना नियुक्तीपत्र देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. म्हाळूणकर यांनी यापूर्वी पक्षाच्या तालुका तसेच जिल्हा पातळीवरील विविध महत्त्वाच्या पदांवर समर्थपणे काम करत पक्ष वाढविला आहे. जिल्ह्यात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्यांच्या अनुभवाचा संघटनेला निश्चितपणे फायदा होईल.

या निवडीबद्दल मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोवळे व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 28/Oct/2024