Ratnagiri : एमआयडीसी येथे परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील प्रिलान्स फिश मिल अन्ड ऑईल प्रा. लि या कंपनीतील परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी १.२५ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

जयराम गुणाराम राजबोंगशी (४८, रा. घोंगापार, तालुमलपूर बक्सा, आसाम) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कंपनीचे सुपरवायझर निखिल विश्वास लाड यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. सुपरवायझर निखिल लाड यांना जयरामला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:48 PM 29/Dec/2025