रत्नागिरीत ‘सिकलसेल’ आजाराचा एकही रुग्ण नाही !

रत्नागिरी : नुकतेच राज्यात ११ ते १७डिसेंबर दरम्यान सिकलसेल आजाराबाबत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला. या मोहिमेत इतर जिल्ह्यात रूग्ण आढळले मात्र रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिकलसेलचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे रत्नागिरीकरांनो घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.

सिकलसेल आजार अनुवांशिक असून हा आजार प्रामुख्याने आदिवासी भागात आढळलतो. आजारामध्ये लाल रक्तपेशींमध्ये अबनॉर्मल हिमोग्लोबीन आढळते. हा आजार केवळ सिकलसेल वाहक किंवा आई-वडिलांडून अपत्यास संक्रमित सिकलसेलग्रस्त त्यांच्या होतो. राज्यातील आदिवासीबहुल भागात हा आजार प्रामुख्याने आढळतो. आरोग्य विभागाने राज्यातील २१ जिल्ह्यात हा आजार आढळत असल्याचे स्पष्ट केले आहे.

यात रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सुदैवाने जिल्ह्यात या आजाराचा एकही रूग्ण नाही. या आजारात बाधित आणि वाहक, वाहकांमध्ये आजाराची लक्षणे दिसत नसली तरी ते समाजात सिकलसेलचा कारणीभूत ठरतात. दोन सिकलसेल किंवा वाहक व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास त्यांच्या अपत्यांनाही हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. प्रसार होण्यास कारणीभूत ठरतात. दोन सिकलसेल किंवा वाहक व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास त्यांच्या अपत्यांनाही हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

आजाराची लक्षणे
या आजारात रूग्णाला तीव्र वेदना, हात-पाय दुखणे, दम लागणे, कावीळ, अॅमिनिया, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, काही वेळाअंतर्गत रक्तस्त्रावासारख्या गंभीर समस्या उदभवतात. अनेकदा रूग्णाला बाहेरून रक्तपुरवठा द्यावा लागतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 30/Dec/2025