गुहागर : माझ्यावर जो जनतेने विश्वास दाखविला आहे तो मी पूर्ण करेन सगळ्यांनाच विश्वासात घेऊन गुहागर नगरीचा विकास करणार असून गुहागर नगरीचा विकास हा एकच ध्यास समोर ठेवून मी काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीता मालप यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केले.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार कार्यक्रम गुहागर नगर पंचायत हॉलमध्ये पार पडला त्यावेळी त्या बोलत होते. हा कार्यक्रम गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष मालप पुढे म्हणाल्या की, येथे येतेवेळी पक्षाचे झेंडे सर्वांनीच बाजूला ठेवावे आपण येथे फक्त गुहागर नगरीचा विकास करण्यासाठी आलेले आहोत. आपल्याला काम करायची आहेत उत्कृष्ट दर्जाची. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने चांगले काम करून आदर्श निर्माण करूया असे त्या म्हणाल्या.
यावेळी माजी आमदार विनय नातू म्हणाले की एक चांगले आदर्शवत नगरपंचायत बनवूया त्यासाठी सर्वांनीच चांगले प्रयत्न करावे या राज्यात सत्ता महायुतीची असून विकास निधी कधीच कमी पडणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले. राजेश बेंडल यांनी ना. उदय सामंत यांनी मदत सर्वांगीण विकाससाठी मदतीचा शब्द दिला होता त्याप्रमाणे दूरध्वनीवरून नगराध्यक्षांचे अभिनंदन केल्याचे सांगितले
जनतेचा विश्वास सार्थकी लावूया…
मी नगराध्यक्ष पदावर बसले आहे ती पक्ष म्हणून नाही तर एक गुहागर शहराची जबाबदार व्यक्ती म्हणून काम करणार आहे. त्यामुळे न. पं. येणाऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाहेर ठेवावेत व शहराचा विकास साधावा. गुहागरच्या विकासासाठी आमच्यावर येथील जनतेने जो विश्वास टाकला आणि आम्हाला निवडून दिले हा विश्वास आपणाला सार्थकी लावण्यासाठी सर्वांना मिळून विकास करायचा आहे. तेथे कोणताही पक्षपातीपणा असणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 30/Dec/2025














