चिपळूण : दसपटीसह दादर गावाचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे. गावची मतदार संख्या महत्त्वाची नसून गावातील लोकांच्या मागण्या पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. मतदान किती होते हे आपण पाहत नाही. मी जनतेचा सेवक असून भविष्यातही अशाच प्रकारच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली.
दादर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या विकासकामांतर्गत विहीर बांधणे (१५ लाख), दादर येथे गणपती विसर्जन घाट बांधणे (१० लाख), दादर अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (२५ लाख), महिला प्रभाग संघासाठी इमारत भूमिपूजन (२५ लाख) आदी विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशोक कदम यांनी दादर येथे नैसर्गिक आपत्तीमध्ये पूल वाहून गेला तेव्हा आ. निकम यांच्या विशेष प्रयत्नातून महत्त्वाच्या ठिकाणी पूल उभारण्यात आल्याचे सांगितले. यावेळी अमित कदम, पांडुरंग माळी, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे, कविता आंबेडे, प्रकाश शिंदे, प्रदीप शिंदे, अनंत सकपाळ, प्रकाश पवार, सविता निकम, मानसिंग कदम, सूरज पवार, प्रवीण पवार, वैशाली नलावडे, सुरेखा गमरे, जान्हवी सकपाळ, जागृती पवार, जगन्नाथ सकपाळ, विलास सकपाळ, जयश्री सकपाळ, संदीप पवार, विजय पवार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 30/Dec/2025














