माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने शेतीशी संबंधित व शेतीपूरक कामाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी गांडूळ खत बेडची तयारी केली आहे व गांडूळ खत निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या उपक्रमाद्वारे महिलांनी जैविक शेतीला चालना देण्याचा संकल्प केला असून, घरगुती ओला कचरा व शेणखत याचा वापर करून सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती केली जाणार आहे.
गावातील प्रगती ग्रामसंघाच्या पुढाकाराने व स्वयंप्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी सरपंच महेश बाष्टे यांनी महिलांचा सहभाग ही ग्रामविकासाची खरी ताकद असून जैविक खत निर्मितीमुळे उत्पन्न वाढीबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल असे सांगितले. या उपक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 30/Dec/2025














