Khed : आंबये येथे भैरी कोटेश्वरी जीर्णोद्धार वर्धापन दिन ४ जानेवारी रोजी

खेड : तालुक्यातील आंबये येथे श्री देवी भैरी कोटेश्वरी, मानाई, झोलाई देवस्थानच्या पाषाण जीर्णोद्धाराचा दुसरा वर्धापन दिन ४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. ग्रामदेवतेच्या पाषाण मूर्तीचा जीर्णोद्धार ४ जानेवारी रोजी पूर्ण झाला असून यानिमित्ताने यंदा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होमहवन, पूजा व आरती, महाप्रसाद, दुपारी ३ वा. जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ आंबये यांचे भजन, भजन सेवेचे नेतृत्व ह.भ.प. वसंत सकपाळ व ह.भ.प. मोहन यादव करणार आहेत.

तसे याचदिवशी सायंकाळी ८ ते ९ हरिपाठ, रात्री ९ ते १० महाप्रसाद आणि रात्री १० नंतर पुन्हा भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष संतोष सकपाळ, सचिव अविनाश सकपाळ यांनी कळवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 30/Dec/2025