रत्नागिरी : वर्ष संपत आले जानेवारी आला तरीही रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामी पिकांची पेरणी सुरूच आहे. आतापर्यंत ६२ टक्के म्हणजेच ३ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पेरणीक्षेत्रात सर्वाधिक पेरा कडधान्य, पालेभाज्यांचे झाले आहे.
यंदा पावसाळा सहा महिने थांबल्यामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यामुळे बळीराजाचा तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे. भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा कमी उत्पादन झाले असून नुकसानच जास्त झाले आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून रब्बी हंगामास सरुवात झाले. आतापर्यंत रब्बी गामात ६२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आणखी १५ ते २० दिवसात रब्बी पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे
कडधान्य, पालेभाज्यांची पेरणी
जिल्ह्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, मिरची, मुळा, पडवळ, वाल, दोडके, कारली, भेंडी, दुधी, घोसाळी, तोंडली, दोडके, काकडी भाज्यांची पेरणी केली तर कडधान्य मध्येकुळीथ, पावटा, हरभरा, कडवायासह विविध पेरणी झाली आहे.
हंगाम वाया गेल्यानंतर उशिराने रब्बी हंगामास सुरुवात झाली. आतापर्यंत ६२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत पेरण्या पूर्ण होतील-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 30/Dec/2025














