देवरुख : शहरातील स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ११व्या वार्षिक आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि कलाप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कलाशिक्षक सूरज मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध चित्रे व इतर कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बाल कलाकारांच्या या चित्रकृती पाहताना मोठ्या कलाकारांइतक्याच प्रगल्भ कलाकृती सादर केल्याची अनुभूती या प्रदर्शनाद्वारे रसिकांनी अनुभवली.
या प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वर्षभरात काढलेली विविधप्रकारची चित्रे व इतर कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र (पोट्रेट), संकल्प चित्र, कोलाज, व्यंगचित्र, भीत्तीचित्र, विविध डिझाईन्स, सुलेखन यांचा समावेश होता. इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या सार्थक जाधव, गुंजन सार्दळ, दुर्वा खेतल, श्रिया अणेराव, दिया खामकर, वृंदा भाटकर, गार्गी खांबे, सान्वी भुरवणे, आर्या खेतल, आर्यन सावंत या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर चित्रे साकारली. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सूरज मोहिते, मुख्याध्यापिका सोनाली नारकर, दीक्षा खंडागळे यांचे प्रोत्साहन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 30/Dec/2025














