Ratnagiri : एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार निवासी शिबिराची करबुडे येथे सुरुवात

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या बावीसव्या निवासी श्रम संस्कार निवासी शिबिराचे उ‌द्घाटन सोमवार दिनांक 29/12/2025 रोजी झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलनाणे करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत एनएसएस क्लॅप ने करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी केले. यामध्ये त्यांनी संपूर्ण सात दिवशी कॅम्पचे नियोजन स्पष्ट केले. सर्वप्रथम नुकतेच स्वर्गवासी झालेले कै. प्रकाश हिरु अग्रे यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्घाटन प्रसंगी करबुडे गावचे सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी आपले मत व्यक्त करताना शिबिरार्थीना शुभेच्छा देत गावातील संपूर्ण कामाविषयी माहिती दिली. दरम्यान पोलीस पाटील हरिश्चंद्र वदरे यांनी विद्यार्थ्यांची आपल्या मनोगतातून कॅम्पचा अनुभव सांगितला. पिंपळकोंड शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णू सागवेकर यांनी आपल्या मनोगतातून गावाची वैशिष्ट्ये सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यांनी शिबिरार्थीची कर्तव्ये, शिस्तबद्धता व विविध प्रकारच्या जानिवांबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी विविध कॅम्पचे अनुभव सांगत या शिबिरातील शिबिरार्थीनी करबुडे येथील विस्तीर्ण अशा बारा वाड्यांमध्ये बोलली जाणारी ग्रामीण बोलीभाषा, विविध प्रसंगी बोलले जाणारे कोकणी शब्द, गाणी याचे संकलन करुन ग्रामीण मराठी भाषेचे संवर्धन करावे असे मत व्यक्त केले.

शिबिर उद्घाटन प्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, गावप्रमुख सखाराम आग्रे, गावकर विलास वेदरे, ग्रामपंचायत सदस्य दीपिका वेदरे, पोलीस पाटील हरिश्चंद्र वेदरे, सुशांत मोहिते वाडी प्रमुख अण्णा कारकर, राजाराम मोहिते, कृष्णा शितप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र वेदरे, उपाध्यक्ष संदीप मोहिते, वैभव कळंबटे, माजी सरपंच श्री. कारकर, शाळेतील शिक्षक कांबळे सर, प्रा. प्रसाद कोळेकर, प्रा. सायली कांबळे. ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्य शिबिरार्थी ग्रामस्थ व जिल्हापरिषद पिंपळकोंड शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 30/Dec/2025