राजापूर : एकाच वेळी १०० पकवाज वादकांसह काल्याचे किर्तनामुळे शेकडो वारकरी व वाटुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी अनमोल पर्वणी ठरली. राज्यातील हा पहिलाच प्रसंग कोकणातील वाटुळ तांबळवाडी येथे साकार झाला. निमित्त होते ते शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीने व प्रसिद्ध कीर्तनकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कैलासवासी ह भ प महादेव बुवा दळवी यांच्या शतक महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याचे.

मागील १५० वर्षापासून वारकरी संप्रदायाची वाटचाल अव्यहातपणे सुरू असलेल्या तांबळवाडी वाटुळ गावात वैकुंठवासी सद्गुरु ह भ प धोंडोपंत दादासाहेब व वैकुंठवासी सद्गुरु ह भ प दत्तोपंत महाराज बडवे यांच्या कृपा आशीर्वादाने व ह भ प श्रीपाद महाराज बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठवासी ह भ प महादेव बुवा दळवी यांच्या शंभराव्या पुण्यस्मरणानिमित्त तांबळवाडी वारकरी सांप्रदायिक मंडळ व तांबळवाडी रहिवासी संघ मुंबई यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे यशस्वी आयोजन संपन्न झाले.
सप्ताहाच्या सातव्या दिवशी आळंदी येथून आलेल्या १०० बाल पखवाज धारक बाल वारकरी यांची राम कृष्ण हरी तालावर निघालेली दिंडी शेकडो वारकरी व वाटुळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी अनमोल पर्वणी ठरली. सप्ताहाचा समारोप ह भ प श्रीपाद महाराज बडवे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला, एकंदरीत कोणत्याही कीर्तनाला दोन ते तीन पखवाज वादक असतात परंतु महादेव बुवा दळवी यांच्या शंभराव्या पुण्यतिथी समारोहाचे अवचित्य साधत १०० बाल पखवाज धारकांच्या साथीने काल्याचे किर्तन संपन्न झाले हे महाराष्ट्रातील प्रथमच उदाहरण आहे असे बडवे महाराज यांनी सांगितले. मागील आठ दिवसात पंढरपूर देहू आळंदी नगरीतील प्रसिद्ध कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा या निमित्ताने दिली। यावेळी नामदेव महाराज तुकाराम महाराज यांचे वंशज तसेच पंधरा वर्षे वयाचे श्रीदत्त महाराज बडवे यांच्याही कीर्तन संपन्न झाले आठ दिवसात वाटुळ पंचक्रोशीतील हजारो वारकरी प्रेमींनी सोहळ्यास उपस्थिती लावली. संपूर्ण सप्ताहात तांबळवाडी वारकरी सांप्रदायिक मंडळ व तांबळवाडी रहिवासी संघ मुंबई यांनी अथक परिश्रम व मेहनतीने सोहळा यशस्वी केला. अख्या तांबळवाडी मधील अबाल वृद्ध महिला पुरुष यांच्या एकीने एवढे मोठे आयोजन शक्य झाले असे प्रसाद महाराज यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 30/Dec/2025














