रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर प्रारंभापासून दक्षता घेण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी ३ वाहने पकडली. तब्ब्ल ८८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८० आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये ४५ लाख रुपये महिन्याच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत किंवा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी विविध ठिकाणी सामूहिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हॉटेल, परमिट रुम-बिअर बार या दिवशी गर्दीने फुललेले असतात. या पार्श्वभूमीवर स्वस्तात मिळणारी गोवा बनावटीचे मद्य आणून ते चढ्या दराने विकून नफा मिळवण्याची प्रवृती वाढीस लागते. ही वाहतूक रोखण्यासाठी दिवस रात्र गस्त सुरु आहे.
भरारी पथकासह सर्व युनिटनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दक्षता घेण्यास सुरुवात केली. याचाच परीणाम म्हणून आतापर्यंत ४५ लाख रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा मद्याची ३ वाहने पकडण्यात आली असून ८८ गुन्हांमधील ८० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 31/Dec/2025














