खेड : खेड-दापोली मार्गावर मौजे साखरोली बसस्टॉपजवळ दि. २८ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या मोटार अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दापोलीहून खेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर साखरोली बसस्टॉप येथे कृष्णा पाटील व जयराम पाटील उभे असताना खेडकडून दापोलीकडे जाणारी दुचाकी (क्र. एम.एच. ०८ ए.वाय. १६७६, हिरो पॅशन) आरोपी उपेंद्र रामाशंकर पासवान (३३, सध्या रा. घाणेखुट लोटे, ता. खेड; मूळ रा. बक्सर, बिहार) याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता निष्काळजीपणे व अतिवेगाने चालवली.
त्यावेळी दुचाकीने साखरोली मधलीवाडी येथील जयराम गंगाराम पाटील (वय ५५) यांना जोराची धडक दिली. या अपघातात जयराम पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी कृष्णा दगडू पाटील (४०, रा. साखरोली मधलीवाडी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 31/Dec/2025














