विषारी औषध प्राशन केलेल्या हातखंबा येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा-झरेवाडी येथील प्रौढाने कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. घराच्या अंगणात बेशुद्ध अवस्थेत आढळला. नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. प्रकाश पांडूरंग गोताड (वय ५५, रा. हातखंबा-झरेवाडी, गोताडवाडी, रत्नागिरी) असे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश गोताड यांना मद्याचे व्यसन होते. गुरुवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या तोंडातून पांढरट रंगाचा फेस आलेल्या स्थितीत घराच्या अंगणात बेशुद्ध अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमावारी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 31-12-2025