देवरुखात प्रयोगशाळा कौशल्ये विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

देवरुख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात देवरुख येथील काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्ये’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.

प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी उच्च शिक्षणातील विविध करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सादरीकरण केले.

डॉ. सागर सकपाळ यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या मूलभूत विज्ञान शाखांमधील विविध करिअरच्या संधींची विश्लेषणात्मक माहिती दिली. प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्रात डॉ. अमित वराळे, डॉ. रणजीत बनसोडे, डॉ. हेमंत चव्हाण व प्रा. प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविली. विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रयोगांचे हँड्स-ऑन ट्रेनिंग देण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कोकणी, प्रा. शिरसाट, प्रा. नटे, प्रा. शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 31/Dec/2025