रत्नागिरी : सांगली जिल्हा निवड समिती सदस्य तथा सक्षम प्राधिकारी, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय व तासगाव आरोग्य शिक्षण पथक गट-ड वर्ग संवर्गातील उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ३१ डिसेंबर रोजी दुपार सत्रामध्ये देवरुख येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. यादिवशी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत. या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 31/Dec/2025














