जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. नानासाहेब मयेकर चषक जनरल क्लास ऑफ द इयर ट्रॉफीचा मान पटकावला.
या महोत्सवात रांगोळी, मेहंदी, व्यंगचित्र, सोलो गायन, एकांकिका, ग्रुप डान्स, फनी डान्स, नेल आर्ट, एकपात्री, सोलो डान्स, माईम अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सांस्कृतिक महोत्सवातून रोज किंग म्हणून साहिल संतोष घाणेकर (तृतीय वर्ष वाणिज्य) आणि रोज क्वीन म्हणून दैवी कमलाकर बोरकर (तृतीय वर्ष वाणिज्य), चॉकलेट किंग (१२ कॉमर्स) विद्यार्थी रोहित थुल व चॉकलेट क्वीन म्हणून सुप्रिया नारायण गोळकर (तृतीय वर्ष कला), बेस्ट कॅटवॉक मुलांमधून समर संदीप शिंदे (तृतीय वर्ष वाणिज्य), तर मुलींमधून सानिका मितेश रकते (तृतीय वर्ष कला) यांची निवड करण्यात आली. तसेच २०२५चा कॉलेज किंग हा किताब शुभम धनंजय शिर्के (तृतीय वर्ष वाणिज्य), तर कॉलेज क्वीन म्हणून निर्जरा मुकद्दर खाडे (तृतीय वर्ष वाणिज्य) हिची निवड झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित मयेकर, संस्थेचे खजिनदार सुरेंद्र माचिवले, प्राचार्य स्नेहा पालये यांनी मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रणाल ओर्पे, जी. एस. प्राची घाणेकर यांनी हा महोत्सव पार पाडला. सूत्रसंचालन प्रा. प्रणाल ओर्पे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 31/Dec/2025














