लांजा : लांजा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सावली कुरूप यांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक दि. १ जानेवारी २०२६ रोजी नव्या वर्षाच्या सुरुवातीला लांजा नगरपंचायत येथे लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
लांजा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा थेट जनतेतून निवड झालेल्या निवडणूकीत सावली कुरूप यांनी भरघोस मतांनी विजय संपादन करून शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी महायुतीची निर्विवाद वर्चस्व मिळवले. महायुतीकडून लांजा नगरपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यात येत असून यामध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या विजयी उमेदवार सौ. सावली कुरूप या लांजा शहराच्या नगराध्यक्षपदावर गुरुवारी विराजमान होणार आहेत.
महायुतीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. सावली कुरूप यांच्यासह नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा नगर पंचायत येथे लांजा-राजापूर चे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी १० ३० वाजता पदभार स्वीकारणार आहेत. गुरूवारी होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याला महायुतीत समाविष्ट असणारे घटक पक्ष व त्यांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 31/Dec/2025














