चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी चिपळूण- संगमेश्वरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मिळाली आहे. महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांच्या नावाची घोषणा झाली असून ते महायुतीतर्फे सोमवार, दि. २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आ. निकम यांनी चिपळूणमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या पाच वर्षात लोकांची केलेली कामे, संपर्क, विकासकामे तसेच महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेची भक्कम पाठिंबा या जोरावर निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, दादा साळवी, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. आदिती देशपांडे, माजी सभापती सौ. पूजा निकम माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलींद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, महायुतीतर्फे सोमवारी (दि. २८) सकाळी १०.३० वाजता महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 28-10-2024














