गुहागर-अक्कलकोट एसटी बस सुरू…

रामपूर : गुहागर आगारातून लांब पल्ल्याची गुहागर अक्कलकोट एसटी बस दीड वर्ष बंद होती. स्वामी भक्तांची व प्रवाशांची ही एसटी बस फेरी सुरू करा, अशी मागणी होती.

अखेर गुहागर आगाराचे नवीन आगार प्रमुख चव्हाण यांनी २५ पासून या बंद एसटी बस पुन्हा सुरू केल्या. गुहागर अक्कलकोट एसटी बस फेरी सकाळी ७.३० वा. गुहागर आगारातून सुटणार असून अक्कलकोट येथे सायंकाळी पोहोचेल. अक्कलकोट येथून सकाळी ६ वाजता सुटणार, ती सायंकाळी ८.३० वाजता ही एसटी बस गुहागरला पोहोचणार आहे.

याचबरोबर तुळजापूर ही एसटी बस सुरू करण्यात आली आहे. गुहागर तुळजापूर एसटी बस पहाटे ५ वा. सुटणार असून, तुळजापूर येथे ४.३० ला पोहोचणार आहे. तसेच सकाळी तुळजापूर गुहागर एसटी बस ६.३० वा. सुटणार असून, ही बस ५ वाजता सायंकाळी पोहोचणार आहे.

या एस.टी. बस फेरी सुरू केल्याबद्दल कोकण विभाग प्रवासी संघाचे अध्यक्ष गणेश चव्हाण, अनिल कुमार जोशी, संस्थापक अध्यक्ष वसंतराव भोसले यांसह अन्य सदस्यांनी गुहागर डेपो मॅनेजर चव्हाण यांना प्रवासी संघाच्या वतीने धन्यवाद दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 28/Oct/2024