खेडमध्ये भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम लांबणीवर

खेड : शहरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगरपरिषद निवडणुकीमुळे निर्बीजीकरणाची मोहीम लांबणीवर पडली आहे. ही मोहीम राबविण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांच्या वावराने नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. अनेकदा अपघातही होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्यासाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. या जागांवरच भटक्या कुत्र्यांना खायला देण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने फर्मान काढले आहे. निर्बीजीकरण मोहीमही राबविण्यात येणार होती. मात्र, नगरपरिषद निवडणुकीमुळे निर्बीजीकरणाच्या मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 31/Dec/2025