लांजा : तालुक्यातील बापेरे गावचे ग्रामदैवत आई भवानी देवीचा यात्रौत्सव २ जानेवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही ग्रामदैवत आई भवानी देवीचा यात्रौत्सव २ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमंतर्गत सकाळी 9 वाजता देवींची पूजा व श्रृंगार, 9.30 वाजता आरती, 10 वाजता देवींची ओटी भरणे, सायंकाळी 7.30 वाजता दिवटी प्रज्वलन, रात्री 9 वाजता महाप्रसाद, रात्री 9.30 वाजता भजन, रात्री 10.30 वाजता देवगड येथील नमनाचा कार्यक्रम होणार आहे.
या उत्सवांर्गत सायंकाळी ७ ते ८ वाजता देवीजवळ दिवटी पेटवून गाहाणे घातले जाते. इतर देवस्थानांकडे मानवंदनेसाठी नेल्या जातात. दिवट्या या परत आणल्यावर देवळासमोर असलेल्या भव्य पटांगणात दोलताशांच्या तालावर नाचवल्या जातात दिवटीवर भाविकांनी आणलेले तेल घातले जाते. यावेळी देवीला साकडे घालून गाऱ्हाणे घातले जाते. या यात्रौत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जयभवानी मित्र मंडळ बापेरे (मुंबई) वालमवाडी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 31/Dec/2025














