रत्नागिरी : जयगड येथे मटका, जुगार चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे बेकायदेशीरपणे मटका, जुगार खेळ चालविणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात दाखल आला आहे. ही कारवाई शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३५ वा. करण्यात आली. शुभम प्रकाश चव्हाण (२९, रा. तांबट आळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल पवन पांगरीकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी संशयित हा जयगड गणेशवाडी ते जयगड बौध्दवाडी जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळ चालवत असतानाही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ३०० रुपये जप्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 28/Oct/2024