Sangameshwar : साडवली येथे दुचाकी-बोलेरोच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू

साडवली : संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने बुधवारी अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मनोहर आत्माराम मेस्त्री (७०, रा. सांगवे वरचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघात प्रकरणी बोलेरो गाडीच्या चालकावर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची खबर ओम रामकृष्ण मेस्त्री (रा. सांगवे वरचीवाडी, २० वर्षे) याने दिली आहे. ओम मेस्त्री हा आपल्या ताब्यातील हीरो होंडा स्प्लेंडर (एमएच ०५, एए ९४८६) या दुचाकीवरून त्याचे काका मनोहर मेस्त्री यांना कोसुंबहून दिशेने घेवून येत होता. याचवेळी प्रतिक नरेश शिंदे (२५ वर्षे, रा. मुंबई) हा आपल्या ताब्यातील महेंद्रा कंपनीची बोलेरो (एमएच ०१ इजे ४६०६) घेवून संगमेश्वरहून देवरुखच्या दिशेने येत होता. वनाज कंपनीजवळ तुळजा भवानी नगर येथे प्रतिक शिंदे हा ओम मेस्त्रीच्या दुचाकीला ओव्हरटेक करत होता.

यावेळी प्रतिक शिंदे याचे बोलेरोवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोची ओमच्या दुचाकीला धडक बसली. दुचाकीवर मागे बसलेल्या मनोहर मेस्त्री यांना यावेळी गंभीर दुखापत झाली. हा अपघात ३१ रोजी सकाळी १० वाजता घडला. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोहर मेस्त्री यांना तात्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषीत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 01/Jan/2026