नवीन वर्षाच्या स्वागताला देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक आणि विठ्ठल भक्त पंढरपूरात आले असताना आज नववर्षाच्या प्रारंभ निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ही संपूर्ण फुलांची सजावट विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर (रा. आळंदी देवाची, पुणे) यांनी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.

या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्हडेजी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे एक टन फुले वापरण्यात आली आहेत. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले आहेत.

श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी, सोळाखांबी, श्री रुक्मिणी चौखांबी आदी प्रमुख ठिकाणी ही फुलांची आरास करण्यात आली आहे.
या सजावटीमुळे विठुरायाचे सावळे साजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 01-01-2026














