Ratnagiri : गोळपमध्ये सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : गोळप-शिरंबाडवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वा. सुमारास करण्यात आली. मिलिंद सिताराम धुळप (४९, रा. मुळ रा. घुडेवठार सध्या रा. गोळप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नावे आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार सुदेश शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी ९.४५ वा. सुमारास संशयित हा आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना गोळप-शिरंबाडवाडीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाजुला बंद ट्रकच्या बाजुला दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 01/Jan/2026