रत्नागिरी : बेदरकारपणे बोलेरो पिकअप गाडी चालवून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तसेच अन्य एका वाहनाला धडक देत अपघात केला. या प्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३५ वा. सुमारास फिनोलेक्स फाटा ते गोळप ब्रीज उतारात घडली.
मनोहर नारायण सावंत (२५, रा. जेल कॉटर्स, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मिलिंद नारायण कारकर (४७, रा. फगरवठार, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांच्या वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. शनिवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच-०८-एएफ-०३१८) घेउन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून एस.एस.टी पॉईंट गावखडी येथे सोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी ओंकार सरनाईक यांना घेऊन फिनोलेक्स फाटा ते गोळपमार्गे गावखडी असे जात असताना हा अपघात झाला.
या घटनेत संशयित आरोपी मनोहर सावंत आपल्या ताब्यातील बोलेरा पिकअप (एमएच-०८- एक्यु ८००) याने मागून येऊन कारकर यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे त्यांची गाडी पुढील सुमोला धडक बसल्याने तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 28/Oct/2024














