रत्नागिरी : जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक व जिल्हास्तरीय समीक्षा समिती तिमाही बैठक नुकतीच जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सप्टेंबर सहामाहीमध्ये सर्व बँकांनी कृषी कर्ज वितरण, शैक्षणिक कर्ज वितरण, मुद्रा कर्ज वितरण यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जिंदल यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.
यावेळी भारतीय रिझर्व बँकेचे एलडीओ बेनज़ीर शेख यांनी अनेक विषयांवर आपले स्पष्टीकरण केले. यानंतर डीडीएम नाबार्ड श्री. टिळेकर यांनी एआयएफ योजनेचा आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते संभाव्य वित्तपुरवठा आराखडा २०२६-२७ चे अनावरण करण्यात आले. यामध्ये नाबार्डकडून ५२८३.३४ रुपये कोटींचा वित्त पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला.
यामध्ये कृषी तसेच प्राथमिकता विभागाला करण्यात आलेल्या वित्तपुरवठा प्रगती यामध्ये पीक कर्ज वितरण प्रगती याचा आढावा घेण्यात आला. या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी २४३७.३० रुपये कोटी, सूक्ष्म व लघु क्षेत्रासाठी १८७५.४१ रूपये कोटी, इतर प्राथमिकता क्षेत्रासाठी ९७०.६३ रूपये कोटीची विभागणी करण्यात आली. असा एकूण ५२८३.३४ रूपये कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा २०२६-२७ जाहीर करण्यात आला.
या बैठकीला आरबीआय एलडीओ बेनज़ीर शेख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, डीडीएम नाबार्ड महेश टिळेकर, महा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अजिंक्य अजगेकर, कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 01/Jan/2026














