रत्नागिरी : सन 2022 23 मध्ये आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत कोतवडे ग्रामपंचायत रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. बक्षीसाची रक्कम रुपये दहा लाख वितरणाचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक माननीय सौ वैदेही रानडे मॅडम यांनी अर्थ विभागाला दिले आहेत.
ग्रामपंचायतला तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्यामुळे माननीय सरपंच श्री संतोष बारगोडे उपसरपंच स्वप्निल पदयाळ ग्रामपंचायत अधिकारी श्री देविदास इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री तुफिल पटेल, श्री हरिश्चंद्र धावडे, सौ. दिया कांबळे, सौ. पायल पांचाळ श्रीमती ज्योती मयेकर, सौ. अनुजा धावडे, सौ. प्रीती बारगोडे, सौ. ज्योती वारेकर व गावातील ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढेही विविध अभियानाची अंमलबजावणी करून गाव समृद्ध करण्याचा निश्चय सरपंच श्री संतोष बारगोडे आणि त्यांचे सहकारी उपसरपंच सदस्यांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 01/Jan/2026














