BJP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरीत भाजपच्या गटनिहाय बैठका सुरू

अडरे : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकांना सुरुवात केली आहे.

यामध्ये उमरोली, कळवंडे तसेच वहाळ, सावर्डे, कोकरे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताह्मणकर, चिटणीस अजित थरवळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष भडवळकर, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, मंडल अध्यक्ष उदय घाग उपस्थित होते.

यावेळी डॉ. नातू, यादव, मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटातील बुथ, बुथ समिती, मतदार यादीचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी युती, महायुतीचा निर्णय लवकरात लवकर करून उमेदवार जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन आपापल्या भागातील विषय मांडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 01/Jan/2026