HPV Vaccine: पूर्णगड येथे एचपीव्ही लसीकरण शिबिर

पावस : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पूर्णगड नं. १ या शाळेत प्राथमिक आरोग्यकेंद्र पावसअंतर्गत उपकेंद्र पूर्णगड यांच्यामार्फत एचपीव्ही लसीकरण करण्यात आले.

आरोग्यसेवक अनिल धोपटे यांनी या लसीकरणाविषयी उत्तम प्रकारे माहिती दिली ‌व जागृती केली. लसीकरणासाठी आरोग्यसेवक धोपटे, आशा पावसकर उपस्थित होते. मुख्याध्यापिका भारती तायशेटे, पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी सहकार्य केले. लसीकरणाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 01-01-2026