चिपळूण : शिवसेना (उबाठा) पक्षाच्या चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक मिथिलेश उर्फ विकी मनोहर नरळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांकडून त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून, सत्तेच्या वाऱ्याला न झुकता जनतेच्या वेदना आणि प्रश्नांना प्राधान्य देणारा चिपळूणचा बुलंद आवाज म्हणून विकी नरळकर पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी चिपळूण नगर पालिकेत काम केले असून, त्यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. सध्या शिवसेना उबाठा गटाचे ५ नगरसेवक आहेत.
चिपळूण नगर पालिकेत विरोधी बाकावर बसून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माध्यमातून जनहिताचा आवाज म्हणून ते काम करतील, अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. शिवसैनिकांचे न्याय्य हक्क, चिपळूणचा सर्वांगीण विकास, नागरिकांचे प्रश्न मांडण्याची त्यांच्यावर सोपवली गेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 01/Jan/2026














