पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी (भुतेवाडी) येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून परिचित असलेल्या श्री भगवती देवीचा वार्षिक यात्रोत्सव आजपासून (ता. २) मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या निमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शुक्रवारी सकाळी मंगलमय वातावरणात देवीच्या मुखवट्यांची विधिवत पूजा करून देव्हारा सजवला जाणार आहे. त्यानंतर हा देव्हारा भक्तगणांच्या दर्शनासाठी मुख्य मंडपात आणला जाईल. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी या ठिकाणी भाविकांची गर्दी होते. यात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळ, शुक्रवारी दुपारी ३ वा. महिला मंडळाचा हळदी-कुंकू आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे भाग्यवान महिला निवडली जाणार असून, तिला देवीच्या मानाची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रात्री ८ वा. क्रिकेट स्पर्धा आणि शालेय स्पर्धांमधील विजेत्यांना ग्रामस्थ मंडळाच्यावतीने बक्षीस देऊन गौरवण्यात येईल तसेच रात्री १२ वा. भुतेवाडीतील भाऊबंदकीच्यावतीने देवीचा पारंपरिक ‘गोंधळ’ घातला जाईल. रात्री १२:३० वा. भाविकांच्या मनोरंजनासाठी ‘कांतारा २’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:36 02-01-2026














