रत्नागिरी : शहरातील मांडवी येथील स्वरुपा बारच्या शेजारी सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या तीन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर रोजी दुपारी १.२० ते १.४५ या कालावधीत करण्यात आली. जमिर अलिमियाँ मिरकर (रा. मधला मोहल्ला, रत्नागिरी), अल्लाउद्दीन कासममियाँ कोतवडेकर (रा. पिंगी मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) व अब्दुल समद अलाउद्दीन सोलकर (रा. मस्तान मोहल्ला मिरकरवाडा, रत्नगिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात शहर पोलिसांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन्ही संशयित हे आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना मांडवी येथील बारच्या शेजारील सार्वजनिक रस्त्यावर दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 02/Jan/2026














